नाईट कर्फ्यू आणि वीकेंड कर्फ्यूच्या कालावधीत परिवहन मंडळाच्या बसने महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत, असे वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने स्पष्ट केले आहे.
कर्नाटकातून महाराष्ट्रातील सोलापूर, औरंगाबाद, पंढरपूर, तुळजापूर, मिरज आणि सांगली याठिकाणी परिवहन मंडळाची बस सेवा सुरू झाली असून या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी काॅरंटाईन, आरटी -पीसीआर चांचणी अहवाल वगैरे कोणतेही निर्बंध असणार नाहीत.
कर्नाटकातून गोव्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मात्र आरटी -पीसीआर/ आरएटी निगेटिव्ह चांचणी अहवाल अनिवार्य असणार आहे.
त्यांचा हा अहवाल तपासला जाईल किंवा गोव्यात त्यांची आरएटी चांचणी केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.