Friday, November 15, 2024

/

पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे शहरात आंदोलन

 belgaum

देशातील इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राज्य काँग्रेसने आजपासून पाच दिवस राज्यभरात ‘नॉट आउट -100’ आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज शुक्रवारी बेळगावात काँग्रेसतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले.

शहरातील वैभवनगर येथील पेट्रोल पंपाच्या ठिकाणी शहर काँग्रेसतर्फे आज सकाळी निदर्शने करण्यात आली. बेळगाव जिल्हा काँग्रेसचे महानगराध्यक्ष राजू सेठ यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या या आंदोलनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू सेठ म्हणाले की, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून वारंवार पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत.

कोरोना लॉकडाऊन काळात लोकांचे जगणे आधीच कठीण झालेले असताना होत असलेल्या या इंधन दरवाढीमुळे लोक अधिकच त्रासले आहेत असे सांगून केंद्रातील जनविरोधी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी जनतेनेच पुढे यावे, असे आवाहनही सेठ यांनी केले.

आजच्या आंदोलनात काँग्रेसचे स्थानिक नेते आर. पी. पाटील, परशुराम वग्गण्णावर, सलीम खतीब, मोहम्मद रसूल मुल्ला, गजू धरनायक, सदा कोलकार, सिद्धार्थ मैत्री, सलमान शेख, पवन पुजारी, संतोष हलगेकर, लता अनसुरकर यांच्यासह बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.