Friday, March 29, 2024

/

यूट्यूब चॅनल संपादकाचा निर्घृण खून

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यात युट्युब चॅनेल चालविणाऱ्या ए का संपादकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

शिवानंद काच्यागोल (वय 32 असे) खून झालेल्या संपादकाचे नांव आहे. शिवानंद हा महायुद्ध यूट्यूब चॅनलचा संपादक होता. मुडलगी तालुक्यातील राजपुरहट्टी येथील चुनीमट्टी गावात गुरुवारी रात्री अज्ञातांकडून त्याचा निघृण खून करण्यात आला.

शिवानंद याच्या घराजवळच हा खुनाचा प्रकार घडला. मात्र उशिरापर्यंत खुनाचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

 belgaum

खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास कार्य हाती घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.