कर्नाटक सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे विश्लेषण, सल्ला व नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने सरकारला सादर केलेल्या आपल्या अंतरिम अहवालात वरिष्ठ स्तरीय विद्यार्थ्यांसाठी प्रथम कॅम्पस वर्ग सुरू करण्यासह शिस्तबद्ध पद्धतीने शाळा पुन्हा सुरू करण्याची शिफारस केली आहे.
कर्नाटक सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे विश्लेषण, सल्ला व नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल सादर केला आहे.
सादर केलेल्या या अंतरिम अहवालात वरिष्ठ स्तरीय विद्यार्थ्यांसाठी प्रथम कॅम्पस वर्ग सुरू करण्यासह शिस्तबद्ध पद्धतीने शाळा पुन्हा सुरू कराव्यात अशी शिफारस करण्यात आली आहे. कार्डियाक सर्जन डॉ. देवी शेट्टी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेला आपला 91 पानांचा अंतरिम अहवाल मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना सादर केला आहे.
आतापर्यंत जगात कुठेही असा पुरावा मिळालेला नाही की विषाणू पसरण्यासाठी शाळा केंद्र होऊ शकते. शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी शास्त्रीय आणि निश्चित मार्गदर्शन करण्याची गरज आहे. कारण शालेय शिक्षण सुरू होण्यास विलंब झाल्यास कोरोनाच्या तुलनेत ते जास्त हानीकारक ठरणार असल्याचे उच्चस्तरीय समितीच्या अंतरिम अहवालात नमूद करण्यात आले आहे.