- रोहन रेडेकर सह गोवा आणि कारवार येथील दोघांचा खंडणीसाठी खून केल्याच्या आरोपाखाली माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष नजीर नदाफ या सूत्रधारासह पाच जणांना बेळगाव पोलिसांनी अटक केली असून कुख्यात डॉन छोटा शकील चा हस्तक रशीद मलबारी यांच्या साठी ते काम करत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे . सोमवारी सकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त टी कृष्णा भट्ट आणि उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांनी ही माहिती दिली आहे .
मुजफ्फर मोहम्मद शेख २४ काकतीवेस बेळगाव , इम्तियाज अब्दुल दलायात ३६ अशोक नगर बेळगाव ,जितन कदम ३१ जगलबेट रामनगर कारवार ,नावीद मुनीर अहमद काजी ३७ वाहन चालक रा महांतेश नगर बेळगाव ,सर्फराज जमादार ३७ साई मंदिर वंटमुरी तसेच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नजीर अहमद नदाफ रा महांतेश नगर माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष बेळगाव अशी पोलिसांनी अटक केलेलयांची नाव आहेत .
नजीर अहमद आश्रयदाता
बेळगाव जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष काँग्रेस नेते नजीर अहमद नदाफ यांनी रशीद मलबारी ला बेळगाव भागात आश्रय दिल होता अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली असून महांतेश नगर आणि सौन्दत्ती येथील आसुंडी येथील फार्म हाऊस मध्ये रशीद मलबारीच येणं जाण होत तर रशीद याला मामू नावाच्या टोपण नावाने सगळे ओळखायचे आणि खंडणी वसुलीची काम करत असल्याची माहिती देखील तपासात उघड झाली आहे.
असा झाला मलबारी च बेळगाव कनेक्शन
रशीद मलबारी २०१२ च्या काळात दोन वर्ष हिंडलगा जेल मध्ये होता त्यावेळी सिमी ऍक्टिव्हिटी मध्ये अडकलेले इम्तियाज दलायात , मुजफर शेख सारखे युवक मलबारी च्या संपर्कात आले मग त्या नंतर मलबारी बेळगाव कनेक्शन वाढले होते .
असं झालं रोहनचा अपहरण
नजीर नदाफ आणि चिंचेचे व्यापारी सुरेश रेडेकर यांचे संबंध होते दोघे जण कोल्ड स्टोरेज मध्ये चिंच ठेवणे आणि इतर कामात त्याची मैत्री होती त्यातूनच नदाफ याने दगा फटका करत रशीद मलबारी यांस सुरेश रेडेकर कडे भरपूर पैसे आहेत अशी माहिती पुरविली होती त्यातूनच दोन वर्षांपूर्वी रोहनच अपहरन करण्यात आलं होतं ही माहिती देखील समोर आली आहे . दोन वर्षांपूर्वीच बेळगाव हायवे वरून अपघात केल्याचं निमित्य करून रोहन च अपहरण करण्यात आल होत त्याला कर्नाटक गोवा सीमेवर चोरला घाटाजवळ नेण्यात आलं होत दोन चार वेळा चाकूने भोसकून त्याचा खून करून मृतदेह जंगलात टाकून देण्यात आला होता . पोलिसांनी चोरला जंगलात रोहन च्या मृतदेहाचे काही भाग मिळवले आहेत . रोहन च्या खून प्रकरणी ए पी एम सी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
बेळगाव शहरातील ८ ते दहा जणावर खून दरोडा केल्याची माहिती देखील पोलीस तपासात उघडकीस आली आहे नजीर नदाफ या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून कुणाकडे जास्त पैसे आहेत याची माहिती मलबारी ला पुरवत होता . बेळगावातील अनके मोठे वयापारी मोठे उद्योजक यांची लिस्ट बनवून खून करण्याचा कट देखील रचला होता . गोवा येथील आशिष रंजन आणि आणखी कारवार जिल्ह्यातील एकट्याचा खून करीन त्यांनी मृतदेह अंकोला आणि यल्लापूर च्या जंगलात टाकला होता अशी माहिती देखील पोलीस तपासात उघड झाली आहे . बेळगावातील आणखी कोण कोण या प्रकरणात आहेत का किती जणां कडून पैसे उकळलेत याचा तपास पोलीस करत आहेत
पोलिसांना बक्षीस
मलबारी मोठं प्रकरण तपास केल्याने पोलीस आयुक्त कृष्णा भट्ट यांनी शहर गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीसण २५ हजारच रोख बक्षीस जाहीर केलं आहे शहरातील अश्या घटना घडल्या तर पोलिसांना न घाबरता संपर्क करा आसवांना अमरनाथ रेड्डी यांनी केलं आहे . या प्रकारांचा तपास करण्यासाठी तीन खास पथकांची नियुक्ती करण्यात आली असून बंगलोर मुंबई आणि बेळगावात हि पथक तपास करत आहेत अशी माहिती देखील रेड्डी यांनी दिली आहे .