Saturday, May 4, 2024

/

चर्चा आमदारांच्या नॅशनल पार्टीची…

 belgaum

बेळगाव दक्षिण चे समितीMes logo आमदार संभाजी पाटील यांचा सोशल मीडिया वर झालेला एका चित्रफितीचे पडसाद रविवारच्या शहर समितीच्या बैठकीत उमटले.या संदर्भात शहर समिती नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका या बैठकीवेळी मांडल्या.आमदार संभाजी पाटलांनी सदर चित्रफीत कोणत्याही मराठी वृत्तपत्र वृत्तवाहिनीकडे मांडली नव्हती एका स्थानिक कन्नड धार्जिन्या वाहिनीकडे दिली होती त्यामुळं मराठी माध्यमांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं रविवारी दिवसभर सदर चित्रफीत सोशल मीडिया आणि व्हाटस अप्प ग्रुप वर वायरल झाल्याने आमदारांच्या भूमीकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करून संताप व्यक्त केला जात होता याबाबत संभाजी पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली नसली तरी शहर समिती बैठकीत याचे पडसाद उमटले होते.

संभाजी पाटील यांना मोर्चात या म्हणून विनंती करणार नाही- प्रकाश मरगाळे

बेळगाव live कडे अनेक युवकांनी समिती प्रक्रियेत युवकांना सामील करून घेण्याची मागणी केली होती त्याची दखल घेत युवकांना समिती प्रक्रियेत सामावून घेण्याची तयारी दर्शविली आहे एक व्यक्ती एक पद या भूमिकेचा देखील मरगाळे यांनी समर्थन केले असून जे कोणी होतकरू युवक असतील त्यांनी यावं त्यांना पद देऊ अशी भूमिका मांडली आहे.
समितीच्या नावावर निवडून येऊन मराठी साठी काम करायची विनंती आम्ही दोन्ही आमदारांना करणार नाही कारण आता पर्यंत सीमा प्रश्नाच्या कोर्टाच्या कामकाजात दोन्ही आमदारांनी केवळ ५ लाख रुपये दिलेत बाहेर ते  एक एक कोटी दिलोय म्हणून सांगतात हे सर्वस्वी चुकीचे आहे. मराठी परी पत्रकांच्या मोर्चासाठी आमदाराना विनंती करणं चुकीचं असून स्वतः होऊन त्यानी मराठी साठी आग्रही असलं पाहिजे असं देखील मरगाळे म्हणाले.
ज्यावेळी पद पाहिजे होत उममेद् वारी हवी होती तेंव्हा मोर्चे घेऊन समिती कडे येत होते चार वर्षांत त्यांचं काम कमी आहे अशी सडेतोड भूमिका देखील यावेळी मरगाळे यांनी मांडली आहे.

 belgaum

आमदारांच वक्तव्य मनाला वेदना देणार मात्र सगळे एकत्रित लढू – मालोजी अष्टेकर

आमदार संभाजी पाटील यांच सोशल मीडिया वरील वक्तव्य दुर्दैवी असून मनाला वेदना देणार आहे अस असलं तरी मराठी म्हणून आपण एकत्रित रित्या लढू सुप्रीम कोर्टातील कामकाजा सोबत रस्त्यावरच्या लढाईत एकी दाखवू अशी भूमिका मध्यवर्ती सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी मांडली आहे रविवारी समिती बैठकीत ते बोलत होते.
सर्वांना विनंती आहे की बेळगाव चा प्रश्न हा लढा फक्त समितीचा लढा नसून बेळगावात राहणाऱ्या सर्व मराठी जणांचा आहे आपापसात न भांडता सर्वांनी एकी दाखवू आणि पूर्वी प्रमाणे मोर्चे यशस्वी करू असंही अष्टेकर म्हणाले.

समोर निवडणूका आल्या की आमच्यात दुही भांडण सुरू होतात दुही होते एरव्ही लग्नात सगळे एकत्रित ताट घेऊन जेवतो कुणाच्या तरी अंतिम संस्कार गेलो तर एकत्र वावरतो मग ही दुही कशाला असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आमदारांना मराठी निष्ठा आणि सत्य पेलण्यात दमछाक-दीपक दळवी

आमदार संभाजी पाटील यांनी सोशल मीडिया वर मांडलेली भूमिका दुर्दैवी असून मराठी निष्ठा आणि सत्य पेलण्यात त्यांची दमछाक झाली आहे म्हणून त्यांनी संभ्रम निर्माण केलाय मराठी जनता त्यांना माफ करणार नाही अशी भूमिका मध्यवर्ती महाराष्ट्र समिती अध्यक्ष दीपक दळवी यांनी मांडली आहे.
रविवारी शहर समिती बैठकीवेळी त्यांनी आपली भूमिका मांडली .

कोणीही पदाची अपेक्षा करू नये अन्यथा मराठी जनताच त्यांना धडा शिकवेल कार्यकर्ते पेटलेत मात्र नेते दुबळे झालेत अशीच अवस्था सध्या झाली आहे त्यामुळं पद महत्वाची नसून ध्येय आणि उद्दिष्ट महत्वाची आहेत असं देखील दळवी म्हणाले

सोशल मीडियावर जनजागृती करा
शहर समिती कडून सोशल मीडियाची दखल घेण्यात आली असून मराठी साठी युवकांना सोशल मीडियाचा वापर करा असे आवाहन देखील करण्यात आलंय
सरकार मराठीची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत असताना शहरात मराठी बोर्ड असलेल्या दुकानातच व्यापार करा मराठी फलक असलेल्ल्या हॉटेल मध्ये चहा फराळ नाष्टा जेवण करा व्यवहार करा अशी जन जागृती सोशल मीडिया द्वारे करा जेणे करून मराठी फलक दिसतील अस आवाहन देखील समितीन केलं आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.