Monday, May 20, 2024

/

बेळगाव कॅन्टोन्मेंटचे रस्ते नांव बदलासाठी सज्ज

 belgaum

बेळगाव लाईव्ह :ऐतिहासिक स्मरणोत्सवात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणाऱ्या महत्त्वाच्या वाटचालीत नजीकच्या भविष्यामध्ये बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील अनेक रस्त्यांची नावे बदलण्यासाठी सज्ज आहेत. कॅन्टोन्मेंट हद्दीतील ब्रिटीश वसाहतवादाचे अवशेष नष्ट करून भारतीय सैनिकांनी दिलेल्या बलिदानाला आदरांजली वाहण्यासाठी 8 ते 10 रस्त्यांचे नांव बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

गेल्या कांही काळ चर्चा सुरू असलेल्या या प्रस्तावाला लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आगामी मासिक बैठकीत गती मिळण्याची अपेक्षा आहे. ब्रिटीश अधिकाऱ्यांचा सन्मानार्थ रस्त्यांची असलेली सध्याची नावे बदलून त्या रस्त्यांना आपल्या शहीद सैनिकांची विशेषत:

कारगिल युद्धासारख्या संघर्षात शौर्याने सेवा बजावलेल्या बेळगाव भागातील सैनिकांची नावे देण्याची योजना आहे. हाय स्ट्रीट, नोलन मार्ग, नथुला रोड, ईडब्ल्यू फर्नांडिस रोड, लिटन रोड, एल्फिन्स्टन रोड, हॅवलॉक रोड अशी सध्या कॅन्टोन्मेंट हद्दीतील कांही रस्त्यांची नावे आहेत.

 belgaum

या नवीन उपक्रमाचा एक भाग म्हणून कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांवर लवकरच धारातीर्थी पडलेल्या वीर सैनिकांची नावे झळकणार आहेत. ज्याद्वारे त्यांच्या स्मृती भावी पिढ्यांसाठी जतन केल्या जातील.

विशेष म्हणजे कॅम्पातील हाय स्ट्रीटचे छत्रपती शिवाजी महाराज मार्गात रूपांतर करण्याची सूचना कॅन्टोन्मेंट सदस्य सुधीर तुपेकर यांनी मांडली आहे. रस्त्यांची नावे बदलण्याचा हा प्रस्ताव स्थानिक ओळख आणि मूल्ये प्रतिबिंबित करणाऱ्या नावांसह प्रदेशाच्या पायाभूत सुविधांना जोडणाऱ्या मोठ्या चळवळीशी संरेखित करतो.

तथापी, लोकसभा निवडणुकीच्या काळात लागू झालेल्या आचारसंहितेमुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाची अपेक्षित मासिक आढावा बैठक एप्रिलमध्ये होऊ शकली नाही. बेळगावमध्ये 7 मे रोजी निवडणुका होणार असल्याने त्यानंतर मासिक सभा पुन्हा सुरू होतील. ज्यामुळे या प्रस्तावित नांव बदलास मंजुरी मिळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल असा अंदाज आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.