Saturday, December 7, 2024

/

गणेबैल डोंगर माथ्यावर प्लास्टिक कचऱ्याचे प्रदूषण

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगाव -खानापूर महामार्गालगतच्या गणेबैल येथील खडकाळ डोंगर माथ्यावरील श्री भूतनाथ मंदिराच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर चित्तथरारक दृश्य पाहायला मिळते. मात्र कचऱ्याचे ढिगारे, मुख्यतः शीतपेय आणि पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांनी व्यापलेले

हे सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण पाहून निराशा होत असून त्यामुळे आपल्या पर्यावरणाची जबाबदारी आपण कधी घ्यायला सुरुवात करणार आहोत? अशी खंत पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहे.तसेच चला गणेबैल डोंगर माथ्यावरील निसर्गाचा खजिना स्वच्छ ठेवूया! असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, या संदर्भात सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. निसर्गाचा अनुभव घ्या आणि त्याचा आनंद लुटा पण तो नष्ट करू नका.

हा काळ सर्वात वाईट आहे परंतु तो सर्वोत्तम काळही आहे, कारण आपल्याकडे अजूनही संधी आहे., 1 लिटर पेक्षा कमी मापाच्या लहान प्लास्टिक बाटल्यांवर बंदी घातल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.,

स्वच्छता ठेवा आणि जबाबदार व्यक्ती बना., आपल्या नवीन पिढीला स्वच्छता किंवा जबाबदारीची जाणीव नाही. ते फक्त फोटो काढण्यासाठी, सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी अशा ठिकाणी जातात.Bhutnath

ते कधीच त्यांच्या जबाबदारीचा किंवा त्यांना काय करण्याची गरज आहे याचा विचार करत नाहीत., कचरा करणाऱ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे तेव्हाच स्वच्छतेची बाब गांभीर्याने घेतली जाईल., अक्कल को घुटने मे रखनेवाले लोग ऐसे काम करते है., आणि मग लोक व्यवस्थेला आणि सरकारला दोष देतात.,

बेळगावमध्ये आणि आजूबाजूला निराशादायक वृत्ती, स्वच्छ भारतामध्ये आपण अयशस्वी झालो आहोत., यासारख्या असंख्य प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.