Sunday, June 16, 2024

/

बेळगावच्या रुग्णास महाराष्ट्र शासनाची एक लाखांची आर्थिक मदत

 belgaum

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सीमा भागातील 865 खेड्यांमधील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी मदत केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून अळवण गल्ली, शहापूर येथील सुनील लक्ष्मण कुरणकर यांना हृदय विकारावरील उपचारासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने 1 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. सदर रक्कम कुरणकर यांच्यावर उपचार करणाऱ्या बेळगावच्याअरिहंत हॉस्पिटलच्या बँक ऑफ बडोदा मधील खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

अळवण गल्लीतील सुनील कुरणकर यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने अर्थ सहाय्य मिळवून देण्यासाठी समिती नेते रमाकांत कोंडूसकर आणि रणजित चव्हाण पाटील यांनी शहर समितीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता.

सदर अर्थसहाय्याबद्दल कुरणकर कुटुंबीय आणि शहापूर येथील कार्यकर्त्यांच्यावतीने आज रविवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. प्रारंभी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आनंद आपटेकर यांनी सर्वांचे स्वागत करून मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेची माहिती दिली.

 belgaum

याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, रमाकांत कोंडुसकर, राजाराम मजुकर, श्रीधर खन्नूकर, बाबू कोले, शशिकांत पाष्टे, बाळू कुरणे, सुनील बोकडे, जयवंत काकतीकर, सौ. प्रियांका कुरणकर, समर्थ कुरणकर आदी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंदगडचे भाजप अध्यक्ष शिवाजीराव पाटील आणि मुख्यमंत्री सहायता निधीचे कार्य समर्थपणे हाताळणारे मंगेश चिवटे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कुरणकर कुटुंबीय आणि नागरिकांच्यावतीने अनिल अमरोळे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सहकार्याबद्दल आभार मानले.

दरम्यान, शहर समितीच्या प्रयत्नातून शिनोळी सीमा समन्वयक कक्ष सुरू करण्यात आला आहे. मात्र लोकसभा निवडणूक आचार संहितेमध्ये त्याचे उद्घाटन होणे बाकी आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व सुविधा या कक्षाच्या माध्यमातून सीमा भागातील मराठी गावांना मिळणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.