Sunday, June 16, 2024

/

सिव्हिल’ आवारात भुरट्या चोरांचा वावर

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सीव्हिल हॉस्पिटल आवारात भुरट्या चोरांचा वावर वाढला असून आज सकाळी एका चोरट्याने मोटरसायकलला लावलेली महागडी हेल्मेट लंपास केली.

संबंधित मोटरसायकल चालक आपली गाडी पार्किंग लॉटमध्ये लावून अवघ्या 10 मिनिटात काम आटपून परतेपर्यंत गाडीला लावलेली त्याची हेल्मेट गायब झाली होती. डॉ. बी. आर. आंबेडकर मार्गावरील सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंग लॉटमध्ये हा चोरीचा प्रकार घडला आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असतानाही या पद्धतीने हेल्मेटची चोरी झाल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

आपली हेल्मेट कोणी चोरली हे पाहण्यासाठी संबंधित मोटरसायकलस्वाराने सिव्हिल मधील सीसीटीव्ही यंत्रणा सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची विनंती केली असता.

 belgaum

त्यांनी त्यास नकार देऊन तसे आमच्या वरच्या अधिकाऱ्यांकडून पत्र आणा आणि त्यासाठी उद्या सकाळी या, असे उडवा उडवीचे उत्तर दिल्याचे कळते. मागील वर्षीही मिलन हॉटेल समोरील सिव्हिल हॉस्पिटल आवारातून सदर मोटरसायकलस्वाराच्या हेल्मेटची चोरी झाली होती.

त्यानंतर आज त्याचे 1600 रुपये किमतीचे हेल्मेट लंपास करण्यात आले आहे. तरी पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सिव्हिल हॉस्पिटल आवारातील भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.