Saturday, December 7, 2024

/

केपीसीसी अध्यक्ष बदलाबाबत काय म्हणाले सतीश जारकीहोळी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष(KPCC) बदलण्याबाबत हायकमांडने चर्चा करणे आवश्यक आहे. या पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे राज्यात पक्षाचे संघटन कुणी करावे, हे हायकमांडने ठरवायाला हवे असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकी होळी यांनी व्यक्त केले आहे.

सोमवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केपीसीसी पदाबाबत वक्तव्य केले आहे.दिल्लीला गेल्यावर विविध खात्यांच्या केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. राज्यातील विकास कामांबाबत चर्चा केली. अनेक प्रकल्पांबाबत नियोजन करण्यात आले आहे. पण, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना भेटल्यावर त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते असे त्यांनी म्हटले.

उपमुख्यमंत्री पदाबाबत पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा व्हायला हवी. उपमुख्यमंत्री पद आणि प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या केवळ चर्चा हे विरोधकांसाठी आयते मुद्दे आहेत. त्यामुळे यावर हायकमांडने विचार करणे गरजेचे आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

उत्तर कर्नाटकात बेळगावला महामंडळांवर अधिक प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करणार आहे, असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. आमदार महेंद्र तम्मनवर आमच्यासोबत असण्याची गरज नाही. लोकसभा निवडणुकीत चिकोडीत चूक झाली होती. यापुढे त्यांना स्थान असणार नाही, असेही पालकमंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.यावेळी आमदार राजू सेठ, जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.Satish jarki

रायबाग आणि कुडची मतदारसंघावर सांगितला दावा

पुढच्या निवडणुकीत रायबाग आणि कुडची हे मतदारसंघ खुले होतील. तिथे संधी मिळाली तर टॉवेल टाकू. चांगला कार्यकर्ता असेल तर त्याला संधी दिली जाईल. अळगवाडीत आम्ही घर बांधत आहोत. ते रायबाग आणि कुडची विधानसभा मतदान संघाजवळ आहे, असे सांगत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या दोन्ही मतदारसंघांवर आपला दावा सांगितला आहे.

सतीश जारकीहोळी यांच्या या वक्तव्यानंतर बेळगाव जिल्ह्यातील पुढील लोकसभा मतदारसंघातील रायबाग आणि कुडची या दोन मतदारसंघावर देखील जारकी वेळी कुटुंबाचे लक्ष लागले आहे यावर देखील चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे जारकीहोळी कुटुंबातील लोकप्रतिनिधींची संख्या वाढणार का यावरही चर्चा सुरू झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.