Friday, September 20, 2024

/

प्रकाश शिरोळकर आणि संभाजी पाटील होते हिटलिस्टवर

 belgaum

रोहन रेडेTarget two Marathi leadersकर याच्या खुनाचे प्रकरण अंडरवर्ल्ड डॉन रशीद मलबारीनेच केल्याचा धक्का शहरवासीयांना बसलेला असताना आणखी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मलबारीच्या हिटलिस्टवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आणि म ए समितीचे आमदार संभाजी पाटील हे दोघे होते. शिरोळकर यांचा गेम तर शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत करायचा होता मात्र काही कारणांनी ते वाचले आहेत

बेळगाव पोलिसांनी केलेले प्रयत्न आणि देवाचा वरदहस्त यामुळेच ते वाचले असावेत, अन्यथा त्यांना संपवून प्रचंड दहशत निर्माण करण्याचा अंडरवर्ल्ड चा कट होता. रशीद मलबारी आणि त्याची गँग अजूनही बाहेर आहे, यामुळेच हा धोका पूर्णपणे निवरला गेला असे म्हणणे कठीण आहे.

रविवार दि ३० एप्रिल रोजी शहरात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक होती, या दिवशी रशीद स्वतः बेळगावात होता. शिवसेना नेते प्रकाश शिरोळकर यांना मिरवणुकीतच उडवून त्यांना संपविण्यासाठी एक टीम पूर्ण मिरवणुकीत कार्यरत होती, त्या टीम मधील मंडळींना शिरोळकर यांना ओळखता न आल्याने ते बचावले आहेत, इतकीच माहिती बेळगाव live ला मिळाली आहे.
आमदार संभाजी पाटील यांचे नावही या यादीत होते मात्र ऐनवेळी पोलिसांनी आपली कारवाई सुरू केल्याने तेही वाचले आहेत
अंडरवर्ल्ड आणि डी गॅंगच्या या मनसुब्यांनी बेळगावला फार मोठा हादरा दिला आहे. ते यापुढील काळात रोखले जावेत ही गरज असून त्यासाठी पोलिसांची भूमिका नक्कीच महत्वाची ठरणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.