बेळगाव लाईव्ह : सीमाप्रश्नी मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेले वक्तव्य, त्या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात बोम्मई यांच्या वक्तव्यावरून उमटणारे तीव्र पडसाद आणि याचदरम्यान दौंड येथे निपाणी-औरंगाबाद साठी धावणाऱ्या बसवर फासण्यात आलेल्या काळ्या शाईतील निषेधाचा मजकूर यामुळे खबरदारी म्हणून एमएसआरटीसीने कर्नाटकात येणाऱ्या बस तात्पुरत्या थांबविल्या आहेत. झालेल्या प्रकारानंतर महाराष्ट्र बससेवा तात्पुरती स्थगित केली आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी बोम्मई यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ कर्नाटक परिवहनच्या बसला काळे फासले. या प्रकारानंतर सीमाप्रश्नी पुन्हा अंतर्गत वाद उफाळून येत असून महाराष्ट्र-कर्नाटक बसेसना काळे फासण्यात येत आहे.
सीमावर्ती भागात चिकोडी, बेळगाव यासह विविध भागात सुरु असलेल्या बससेवा या प्रकारानंतर बंद करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात घडलेल्या प्रकारानंतर कर्नाटकातील मराठी दुराभिमानी लोकांनी देखील असाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महाराष्ट्र परिवहनने बससेवा काही काळासाठी स्थगित केली आहे.
महाराष्ट्र बसला फासले काळे..
दरम्यान.. कर्नाटक नवनिर्माण संघटना या कानडी संघटनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला काळे फासले आहे कलबुर्गी जिल्हाध्यक्ष रवींद्र जमादार यांच्या नेतृत्वाखालील कानडी कार्यकर्त्यांनी अफजलपुर तालुक्यातील बेळूरगी येथे महाराष्ट्र बसला आंदोलन केले.