कोरोना प्रादुर्भावाला थोपविण्यासाठी सरकारने येत्या शुक्रवारपासून लागू केलेल्या सलग तीन दिवसांच्या कडक लाॅक डाऊनसंदर्भात मनपा आयुक्तांच्या आदेशावरून आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वार्ड क्र. 20 आणि 21 मध्ये जनजागृती मोहीम राबविली.
महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक शिल्पा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वच्छता निरीक्षक संजय पाटील व नितिन देमट्टी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या मार्शल्सनी येत्या दि. 4, 5 व 6 जून रोजीच्या कडक लाॅक डाऊनसंदर्भात आज वार्ड क्र. 20 आणि 21 मध्ये स्पीकरव्दारे जनजागृती केली.
शहापूर खडेबाजार, संपूर्ण भाजी मार्केटसह वॉर्डातील गल्लोगल्ली फिरून महापालिकेच्या पथकाने लॉक डाऊनच्या काळात कोणीही अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. वाहनांवरून फिरू नये. लॉक डाऊन नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल.
येत्या शुक्रवारपासून सलग तीन दिवस दूध आणि औषधाची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने संपूर्ण बंद ठेवावीत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याना दंड आकारला जाईल. तसेच वाहने जप्त केली जातील, अशी जनजागृती केली.
महापालिका आयुक्तांच्या आदेशावरून राबविण्यात आलेल्या या जनजागृती मोहिमेमध्ये आरोग्य निरीक्षिक शिल्पा कुंभार, नितिन देमट्टी, संजय पाटील, किरण देमट्टी, शुभाष घराने, प्रशांत, सचिन देमट्टी, कल्पना केरगेरी व मारुती गोल्लर या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.