गौंडवाड येथील सुरू असलेल्या देवस्थान जमिनीच्या वाद पुन्हा उफाळून आला असून दोन गटात हाणामारी होऊन दोन जण जखमी झाले आहेत.गेल्या एक वर्षापासून हा देवस्थान जमिनीचा वाद सुरू आहे. सर्व्ह नंबर 78/88 ही जमीन देवस्थानाच्या मालकीची असून त्याबद्दल वाद सुरू आहे. हा जुना वाद पुन्हा एकदा रविवारी उफाळून आला आणि त्यामधून हाणामारी आणि जाळपोळ याचे प्रकार घडले आहेत.
यापूर्वी दि. 30 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री जमिनीच्या वादातून गौंडवाड येथे दोन गटांत मारामारी होऊन दगडफेकीची घटना घडली होती. त्यानंतर आज पुन्हा 6 जून 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता दगडफेक आणि जाळपोळ झाल्यायमुळे गौंडवाड गावात तणाव निर्माण झाला आहे.
गावामध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी अनेकवेळा तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र याला अपेक्षित यश आले नाही.
देवस्थान कमिटीची जमीन बेकायदेशीरपणे विकण्यात आल्याचे ग्रामस्थांनी आरोप केला आहे. त्यामुळे देवस्थान कमिटीच्या जमिनीच्या वादातून गौंडवाड गावामध्ये झालेल्या मारामारी प्रकरणी केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. गेल्यावेळीही मारहाणीमुळे गावातील वातावरण बिघडले आहे.
अशा कोणत्याच प्रकारची भूमिका नागरिकांनी घेऊ नये निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चेतून तोडगा काढावा, असे सांगितले होते. पण आज पुन्हा जाळपोळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. तीन घरांची तोडफोड झाली आहे. गावामध्ये काहीजणांच्या घरांवर दगडफेक करून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
वादावर सर्वसंमतीने तोडगा काढण्यात येईल. आपण कायम ग्रामस्थांच्या पाठीशी असून एकजुटीने गावचा सर्वांगीण विकास साधूया, असे आवाहन आमदार सतीश जारकिहोळी यांनी केले. सदर वाद अनेक दिवसांपासून धुमसत होता. गावामध्ये काहीजणांच्या घरांवर दगडफेक करून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
या प्रकरणी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली असून गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.