शाळा प्रारंभीच्या पहिल्याच दिवशी झाड दोन शाळकरी मुलांचा पाण्याच्या खड्ड्यात पडून दुदैवी मृत्यू झाला आहे.सोमवारी ही घटना खानापूर तालुक्यातील गणेबैल गावा जवळ घडली आहे.
झाडअंकले येथील विठ्ठल परशराम निलजकर (वय १२, इयता सहावी गणेबैल मराठी शाळेचा विद्यार्थी,) आणि दुसरा विद्यार्थी भुतनाथ दिपक निलजकर ( वय ८ ,इयत्ता दुसरी झाड अंकले मराठी शाळा ) अशी या घटनेत मयत झालेल्या दुर्दैवी विद्यार्थ्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी मयत मुले आजीसोबत म्हैस धुण्यासाठी पाण्याच्या खड्डयाकडे गेली होती.आजी म्हैस धुवुन घरी परतली परंतु मुले खड्डयाकडे गेली होती.
याच खड्डयात रविवारी म्हैस अडकली होती. तो खड्डा बघण्यासाठी एक मुलगा पुढे सरसावला त्यात त्याचा पाय घसरला व तो पाण्यात पडला, त्याला पकडण्यासाठी दुसराही मुलगा गेला तो ही पाण्यात बुडाला. दोन्ही मुले पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाले.
या घटनेने झाडअंकले गावावर शोककळा पसरली आहे पोलिसांनी घटनास्थळी धावघेत मुलांचे मृतदेह पाण्या बाहेर काढले.विठ्ठल व भूतनाथ हे दोघे आपापल्या कुंटूंबाला एकुलते एक मुलगे होते त्यामुळे निलजकर कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी खानापूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.