राज्यात लॉकडाऊन जारी झाल्यापासून बंद असलेले बेळगावचे सब रजिस्ट्रार कार्यालय आज सोमवारपासून पूर्ववत सुरू झाले आहे. सदर कार्यालय सुरू झाल्यामुळे जमिनीच्या व्यवहारासह संबंधित अन्य क्षेत्रातील मंडळींना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भावाची तीव्रता वाढल्यामुळे अन्य कार्यालयांप्रमाणेच बेळगावचे सब रजिस्ट्रार कार्यालय देखील गेल्या दीड-दोन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे या कार्यालयाशी संबंधित जमिनीच्या व्यवहाराससह अनेकांची अन्य सरकारी कामे ठप्प झाली होती.
सब रजिस्ट्रार कार्यालयकडून कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यामध्ये खंड पडल्यामुळे अनेक जण विवंचनेत पडले होते.
मात्र आता हे कार्यालय आजपासून पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. सदर कार्यालय सुरु झाल्यामुळे संबंधित सर्वांना दिलासा मिळला आहे.