घरात बेशुद्धावस्थेत पडलेल्या व्यक्तीला सामाजिक कार्यकर्त्यांनी जीवदान दिले.सावरकर रोड येथील विश्वनाथ गायचारी (५६) हे आपल्या घरात एकटे राहतात.
गेल्या चार दिवसांपासून त्यांनी घराचा दरवाजा उघडला नव्हता.शेजाऱ्यांनी देखील त्यांना चार दिवसापासून घरा बाहेर आलेले पाहिले नव्हते.त्यामुळे शेजाऱ्यांनी शंका येवून त्यांच्या घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले.खिडकीतून पाहिले असता ते बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले.
आजूबाजूच्या लोकांनी हेल्प फॉर निडीचे सुरेंद्र अनगोळकर आणि संतोष दरेकर यांच्याशी संपर्क साधला.
ही माहिती ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना देखील देण्यात आली.
पोलीस आल्यावर त्यांच्या उपस्थितीत दरवाजा खोलून आत बेशुध्द अवस्थेत पडलेल्या विश्वनाथ गायचारी यांना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रसाद उचगावकर आणि मोहन घाटगे यांनीही यावेळी मदत केली.सध्या गायचारी यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
जर कोणाला ही आरोग्य समस्येमुळे त्रास होत असेल तर कृपया आम्हाला कळवा असे अनगोळकर यांनी आवाहन केलं आहे .यावेळी अनिल अष्टेकर, रोहित जांभळे .भरत नागरोली निलेश पाटील , श्रीनिवास साके ,राहुल नायक उपस्थित होते.