जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पीयूसी परीक्षेचा निकाल-गेल्या वर्षीपासून कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वच परीक्षा उशिरा झाल्या किंवा पूर्ण तयारीनिशी घेण्यात आल्या नाहीत.
या पार्श्वभूमीवर 2020 -21 मध्ये घेण्यात आलेल्या पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेचा निकाल येत्या जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे.
सदर निकाल कोणत्या निकषावर घोषित करायचा याबाबत 12 जणांची एक तज्ञ समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्या समितीच्या शिफारसीनुसार निकाल घोषित केला जाणार आहे.
निकालाची घोषणा करताना कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे.
तथापि निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी नाराज न होता भौतिक परीक्षेला हजर रहावे, असे आवाहन शिक्षण मंत्री यांनी केले आहे.