बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले.जवळ जवळ दीड महिन्यापासून सगळे व्यापार आणि उद्योग ठप्प झाले आहेत.त्यामुळे कामगार वर्ग देखील अडचणीत आला आहे.
व्यापारी देखील बाजारपेठ बंद असल्याने अडचणीत आले आहेत.त्यामुळे अन्य जिल्ह्यामध्ये उद्योग,व्यवसायांना जशी परवानगी दिली आहे.
त्याप्रमाणे बेळगावात देखील दुकाने,उद्योग सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांच्याकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी प्रसंगी आमदार अनिल बेनके आणि राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी उपस्थित होते.चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गोविंद कर्जोळ यांची भेट घेवून देखील दुकाने आणि उद्योग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.