मागील आठ ते दहा दिवसांपासून अधून मधून मोठ्या सरी पडत आहेत. सध्या पेरणीचे काम जोमात आहे. त्यामुळे उघडीप मिळाल्यास शेतकऱ्याने त्याचा मोठा फायदा होणार आहे. बेळगाव जिल्ह्यात पाच टक्के पेरणी पूर्ण झाल्या आहेत तर येत्या पंधरा दिवसात पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे.
कधी एकदा ढगाळ वातावरण कमी होते आणि पेरणीचे काम कधी पूर्ण होणार याकडेच शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दोन दिवसापूर्वी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे पेरणी कामातमध्ये समस्यां निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर काहीशी उघडीप दिल्याने शेतकरी पुन्हा कामात गुंतला आहे. मात्र हे वातावरण आणखी पंधरा दिवस तरी नको रे बाबा अशी मागणी शेतकर्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान जर आता पाऊस पडला तर पुन्हा पेरणी व इतर कामात व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या तरी पाऊस नको रे बाबा अशीच मागणी होत आहे. दरम्यान पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
धूळवाफ पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांनी कल वाढविला आहे. याचबरोबर शेतातील इतर कामेही करण्यासाठी शेतकरी धडपडत आहे. मात्र जर पाऊस पडला तर पुन्हा समस्या निर्माण होणार यात शंका नाही. यामुळे आता तरी पावसाने उघडीप द्यावी रे बाबा अशीच मागणी शेतकरी करू लागले आहेत.
काही ठिकाणी पेरणी झालेल्या पिकांना हा पाऊस पोषक ठरला आहे तर पेरणीसाठी धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांना या वातावरणामुळे चिंता लागून राहिली आहे.