केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा आणि कामगार सुधारणा कायदा आणि राज्य सरकारच्या भूसुधारणा कायद्याच्या विरोधात बेळगावात शेतकऱ्यांनी शनिवारी जोरदार निदर्शने केली. यावेळी राज्य पत्रांच्या प्रति जाळून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
विविध शेतकरी संघटनाच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शनिवारी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा आणि कामगार सुधारणा कायदा आणि राज्य सरकारच्या भूसुधारणा कायद्याना विरोध दर्शवण्यात आला.
राज्य पत्राच्या प्रतीचे दहन करून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून ही लढाई पुढेही सुरूच ठेवण्याचा इशारा निदर्शकांनी दिला.
5 जूनचा चा दिवस क्रांती दिन म्हणून पाळण्याचे आवाहन दिल्लीहून अखिल भारत संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. त्यानुसार आज संपूर्ण क्रांती दिन पाळण्यात येत आहे. शेतकरी, कामगारांच्या विरोधातील कायद्यांच्या समावेश असलेल्या राज्य पत्रांच्या प्रतींचे दहन करून निदर्शने करत आहोत असे अखिल भारतीय कृषक समाजाचे राजाध्यक्ष सिदगौडा मोदगी यांनी सांगितले
तर शेतकरी नेते प्रकाश नाईक यांनी केंद्र सरकारने लोकशाहीच्या विरोधात जाऊन विधेयक द्वारे कृषी सुधारणा कायदे आणून ६ महिने पूर्ण झाले. कोरोना पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळून सांकेतिक आंदोलन आज करतआहोत. भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.