बेळगाव हुन गोव्याला जाण्यासाठी 3 मुख्य मार्ग आहेत तिन्ही मार्गाचे रस्ते तीन घाट उतरून बेळगावहुन गोव्याला लोक ये जा करत असतात.त्यापैकी अनमोड, चोर्ला आणि आंबोली घाट होय.
बेळगाव हुन गोव्याला जाण्यासाठी आंबोली घाट अंतर इतर मार्गापेक्षा किंचित लांब पडते आणि अनमोड रस्त्याचे काम सुरू आहे त्यामुळे बेळगाव हुन गोव्याला जाण्यासाठी अनेक जण चोर्ला घाटाचा मार्गाचा पर्यायी रस्ता म्हणून सध्या वापर करत असतात. याच रस्त्यावरून अंतर देखील कमी होते त्यामुळे अनेकांची पसंती बेळगाव हुन गोव्याकडे जाण्यासाठी चोर्ला रोड अशीच असते.
चोर्ला घाटातून 1 जुलै ते 31 डिसेंबर पर्यंत अवजड वाहनांसाठी वाहतूक बंदी घालण्यात आली आहे.उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांनी हा आदेश बजावला आहे.त्यामुळे बेळगाव हुन गोव्याला जाणाऱ्या अवजड वाहनांना आता दुसऱ्या मार्गाचा पर्यायांचा अवलंब करावा लागणार आहे.
बेळगाव हुन चोर्ला द्वारे ये जा करणाऱ्या वाहनाची संख्या वाढली आहे परिणामी घाटात रहदारी अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
भाजी पाला पोचवणे तारेवरची कसरत
सध्या बेळगाव गोवा अवजड वाहनांची वाहतूक सुरू असलेल्या अनमोड घाटाची अवस्था दयनीय आहे.रामनगर ते अनमोड दरम्यान रस्त्यावर भले मोरहे5 खड्डे बनले आहेत.या रस्त्यावर अनेक ट्रक अडकून पडले आहेत अश्या परिस्थितीत माजी मंत्री आर व्ही देशपांडे यांनी बिल्डकॉन कम्पनीला काम त्वरित पूर्ण करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
अनमोड रस्त्याचे काम बंद आहे त्यामुळे अवजड वाहनांना भाजी पाला सारखा माल बेळगाव हुन गोव्याला पोचवणे तारेवरची कसरत ठरणार आहे