कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत स्वतःच्या जीव धोक्यात घालून समाजासाठी झटणारे कोरोना वारीयर सुरेंद्र अनगोळकर यांना आर्थिक मदत देत सेंट्रल स्कुलच्या माजी विध्यार्थ्यांनी सत्कार केला.
गेल्या दोन महिन्याच्या काळात हेल्प फॉर नीडी या संघटनेच्या माध्यमातून सुरेंद्र यांनी शेकडो मृतदेहावर अंतिम संस्कार केलाय अनेक कुटुंबांना जेवण व रेशन किटच मदत केली आहे. मोफत अन्नसेवा रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे असहाय्य लोकांना मदत करणे यासाठी अहोरात्र सेवा करणाऱ्या सुरेंद्र अनगोळकर यांचा सन्मान नुकताच सेंट्रल हायस्कूल च्या प्रांगणात करण्यात आला.
सुरेंद्र अनगोळकर हे सेंट्रल हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत त्यामुळे शाळेच्या आवारात हा छोटासा कार्यक्रम शाळा परिसरात करण्यात आला.
![Angolkar help for needy](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2021/06/IMG-20210601-WA0309.jpg)
सेंट्रल हायस्कुलच्या माजी वर्गमित्रांनी “कोविड़ निवारण कर्तव्यनिधि “जमविला होता त्यातील ₹16000,(सोळा हजार रुपये) सुरेंद्र अनगोळकर यांना देणगी देऊन त्यांच्या या सेवेचा सन्मान झाला या सत्कार प्रसंगी “सेंट्रल हायस्कूल च्या पूर्वसूरिच्या शिक्षकांनी केलेल्या संस्कारा मुळेच “सुरेंद्र अनगोळकर “हा समाजसेवक घडला या बद्द्ल संस्थांला व शिक्षकांना आदर्श मानतो असे कृथार्थ उदगार काढले,आणि आत्यंतिक भाऊकपणे त्यानी हा सत्कार स्विकारला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रफुल्ल शिरवलकर यांनी केले.या प्रसंगी मुख्याध्यापक विश्वजीत हसबे, माजी वर्गमित्र विनोद हंगिरकर,संजय हिशोबकर,गिरीष धामणेकर,आदीनाथ सालगूडे, यशवंत परदेशी, ह.भ.प.राजू कावळे, विकास मांडेकर आदी वर्गमित्रांची उपस्थिती होती.