जिल्हा रुग्णालयाची अतिरिक्त जबाबदारी प्रादेशिक आयुक्त आमलन आदित्य विश्वास यांनी स्वीकारल्या पासून तेथील व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होत आहे.
गेल्या सव्वीस दिवसात जिल्हा रुग्णालयात शंभर म्युकर माय सोसिस आणि ब्लॅक फंगसच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी जिल्हा रुग्णालयात दिवसाला एक किंवा दोन शस्त्रक्रिया केल्या जात होत्या.पण अन्य वैद्यकीय संस्थांच्या मदतीने ई एन टी तज्ञांना निमंत्रित करून दिवसाला सहा शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत.
या शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञ आणि अन्य तज्ञ डॉक्टरांचे तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभत आहे.सध्या ९५ रुग्ण दाखल झाले असून त्यापैकी साठ रुग्णावर आय इन व्हॉल्व मेंट करण्यात आली आहे.
पस्तीस रुग्णावर डोळ्यांचे उपचार करण्यात आले असून त्यांच्या दृष्टीत लक्षणीय सुधारणा होत आहे.जिल्हा रुग्णालयातील सगळे डॉकटर आणि अन्य तंत्रज्ञांची देखील या शस्त्रक्रिया करण्यात आणि उपचार करण्यात सहकार्य लाभत आहे.