बेळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूची भीती व्यक्त केली जात असून त्यासाठी कोरोना संसर्ग तीव्रतेच्या निकषावर 15 जणांचे सिक्वेन्सींग करून नमुने तपासणीसाठी बेंगलोरला धाडण्यात आले आहेत तपासा अंती सगळे नमुने निगेटिव्ह आल्याने बेळगावातील डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
महाराष्ट्रासह देशातील आठ राज्यांमध्ये ‘डेटा प्लस व्हेरीएंट’ या विषाणूचा संसर्ग सुरू झाल्याची भीती असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग तीव्रतेच्या निकषावर बेळगाव जिल्ह्यातील 15 जणांचे सिक्वेन्सींग करून नमुने तपासणीसाठी बेंगलोरच्या निम्हस् आणि एनसीबीएस प्रयोगशाळेत धाडण्यात आले होते. त्
यांचा तपासणी अहवाल अद्याप हाती आला असून सगळे जण डेल्टा निगेटिव्ह आहेत. तथापी आत्तापर्यंत तरी बेळगाव जिल्ह्यात डेटा प्लस विषाणू संसर्ग आढळून आलेला नाही, अशी माहिती बीम्स हॉस्पिटलचे प्रभारी संचालक डॉ. उमेश कुलकर्णी यांनी दिली आहे. मात्र जनतेने सावधगिरी बाळगावी असेही आवाहन केले आहे.