Friday, January 10, 2025

/

रिंगरोडसाठी ६७५ हेक्टर जमिनीचे संपादन होणार…!

 belgaum

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकतेच एक नोटिफिकेशन जाहीर केले असून या नोटिफिकेशन अनुसार बेळगावच्या आजूबाजूने एक रिंगरोड होणार आहे या रिंगरोडसाठी ६७५ हेक्टर जमिनीचे संपादन होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामध्ये सुपीक जमिनीचाही समावेश असणार आहे राष्ट्रीय महामार्ग ४ए पासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ४ पर्यंत बावीस किलोमीटर त्यानंतर बेळगाव बायपास नवीन महामार्ग अश्या रिंगरोड साठी कर्नाटकातील सर्वात मोठे भूसंपादन होणार असून, बेळगाव शहरातील असलेली रहदारी दूर करण्याचे दृष्टीने संपूर्ण बेळगावच्या आजूबाजूला रिंग रोड केला जाणार आहे. यासाठी ६७५ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. अशी माहिती मिळालेली आहे .

जमीन सुपीक असल्यामुळे शेतकरी पिके घेतात. अशी दुबार पीक घेणारी जमिनी देणार नाही अशी भूमिका घेणार आहेत सध्या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे .या रिंग रोड मध्ये बेळगाव लागत असलेल्या बऱ्याच गावामध्ये भूसंपादन होणार आहे. अद्याप कोणतीही जमीन संपादित करण्यात आलेली नाही मात्र नोटिफिकेशन काढण्यात आली असून हरकती मागवण्यात आले आहेत या हरकती दाखल केल्या नंतरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुढील कामे करणार आहे.

ring-road-belagavi

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केलेल्या अधिसूचनेत सहा लेनचा एकूण ३८ की मी रिंग रोड बनवण्यात येणार आहे. यासाठी तब्बल ६७५ एकर सुपीक जमीन बळकावली जाणार असून शेतकऱ्यांच्या जमिनीवर कुऱ्हाड पडणार आहे. सध्या या अधिसूचने नंतर शेतकऱ्यां कडून हरकती दाखल करून घेण्यात येणार आहे.

बेळगाव सभोतालच्या भुतरामहट्टी, हालभावी,बंबरगे,हंदीगनूर,चलवेनहट्टी,केदनूर,मन्नीकेरी, अगसगे,कडोली,जाफरवाडी देवगिरी,अलतगा,गौडवाड, होनगा, सोनट्टी, धरणट्टी, हुदली,कडलपूर,बरम्यानहट्टी, कलखांम्ब,मुचंडी अष्टे, बेक्कीनकेरे,अतवाड,मरणहोळ,गोजगे,मंन्नूर, आंबेवाडी,सुळगे,उचगावं कल्लेहोळ,बसुरते, तुरमुरी बाची,कुद्रेमनी, बेळगुंदी,बोकमुर सावगाव,मंडोळी,बीजगरणी,कावळेवाडी ,राकसकोप्प, किणये,कर्ले ,जानेवाडी, कुट्टलवाडी,संती बस्तवाड, बहाद्दरवाडी,वाघवड़े ,देसुर, सुळगे येळळुर, राजहंसगड,नंदी हळ्ळी,झाड़शाहपुर,धामणे, यरमाळ,खनगाव,बाळेकुन्द्री निलजी शिंदोळी,बसरिकट्टी,मविनकट्टी,चंदन होसुर,तारिहाळ, मास्त मर्डी,हलगा बस्तवाड,खमकार हट्टी ,कुलिकोप,साम्बरा, मुतगा काकती, मछे,पिरनवाड़ी, धामणे कणबर्गी आदि तीस हुन अधिक गावातील जमीन संपादित होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.