Friday, September 20, 2024

/

निधीअभावी मेगा बायोडायव्हर्सिटी पार्क चे तीन तेरा

 belgaum

उत्तर कर्नाटकात सर्वात मोठा असा बायोडायव्हर्सिटी पार्क वनविभागाने बेळगाव उभा केला आहे. येथील व्हिटीयु विद्यापीठाच्या बाजूला हा पार्क उभा असून सध्याची अवस्था अतिशय बिकट आहे. निधीच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे हा पार्क मच्छे गावापासून जवळच तीनशे वीस एकर जागेत वसलेला आहे.

बेळगाव चोरला रस्त्यावरती सत्तर हजार रोपटी लावून हा पार्क करण्यात आला आहे. यामधील साठ एकर जागेत वनौषधींचे करण्यात आले आहे. नगर उद्यान प्रकल्पांतर्गत ही व्यवस्था करण्यात आली असून लागणाऱ्या एकूण खर्चापैकी ८० टक्के निधी केंद्र सरकारने दिला आहे उरलेला २० टक्के निधी राज्य सरकारने द्यायचा आहे केंद्र सरकारने दोन कोटी रुपये मंजूर केले उर्वरित निधी राज्य सरकारने देण्यास तयार केलेली नाही.

Bio park
या बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये कदंबा ,सागरी यासारख्या वेगवेगळ्या वनस्पती लावण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांसाठी खेळण्याची जागा, जॉगिंग, सायकलिंग, योगा सेंटर ,मेडिटेशन सेंटर त्याचबरोबर फुलपाखरांचे मैदान योजना फक्त कागदावर आहेत. त्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर निधी मंजूर करणे गरजेचे आहे.
बेळगावचे डीएफपो अमरनाथ यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत. मात्र वनविभागाचे अधिकारी आम्ही निधी मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत असे सांगत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.