काँग्रेस पक्षाच्या संसदीय कार्यकारिणी बैठकीला अनुपस्थित राहिल्यावरून बेळगाव जिल्हा पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर पक्षातर्फे कारवाई होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही बैठक झाल्यानंतर केपीसीसी अध्यक्ष दिनेश गुंडुराव यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांची अनुपस्थिती गांभीर्याने घेणार असून पक्ष प्रमुखांकडे याबद्दल तक्रार करणार आहे असे सांगितले.
जारकीहोळी यांच्या बरोबरच उत्तर कर्नाटकातील बरेच जण अनुपस्थित राहिले आहेत.माजी मंत्री एम बी पाटील ज्यांना यावेळी मंत्रिपद मिळालेलं नाही त्याच बरोबर माजी मंत्री रोशन बेग आणि रामलिंगा रेड्डी हे सुद्धा अनुपस्थित राहिले आहेत.
पीएलडी बँक राजकारणात काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी के शिवकुमार यांनी सतीश व रमेश जारकीहोळी यांच्या विरोधक लक्ष्मी हेब्बाळकर यांची बाजू घेतल्याने तेंव्हापासूनच ते नाराज असून पार्टीच्या कुठल्याच कार्यक्रम किंव्हा बैठकांना उपस्थित राहत नाहीत. आता पक्ष काय करतो याकडे लक्ष लागून आहे.