२२ डिसेंबरला होत असलेल्या कर्नाटक राज्य मंत्रीमंडळ विस्तार प्रक्रियेत उत्तर कर्नाटकास प्राधान्य मिळावे अशी मागणी जेडीएस काँग्रेस संयुक्त सरकारचे समन्वयक माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाच्या संसदीय कार्यकारिणी बैठकीत यावर चर्चा झाली.
मंत्री पदे तसेच विविध मंडळांच्या नामांकित पदानियुक्तीस उशीर होत असून यामुळे काही आमदार नाराज आहेत. याचा विचार करून मंत्रीमंडळ विस्तार लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.काँग्रेस तर्फे विस्तार प्रक्रियेत सहा जणांची नावे द्यायची असून त्यात उत्तर कर्नाटकाला जास्त प्राधान्यक्रम दिला जाईल असे वातावरण आहे.
काँग्रेस जेंव्हा आपली यादी देईल तेंव्हा विस्तार करू असे मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले आहेत.