भंगी बोळ वापरात आली पाहिजे यासाठी राज्य सरकारने अभियान राबवले असून बेळगाव शहरात बोळात झालेल्या अतिक्रमणा चौकशी करून सर्व भंगी बोळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणावर हाथोडा आणू कुणाचीही गय करणार नाही असा इशारा नगर विकास मंत्री यु टी खादर यांनी दिला आहे.
सिटीझन कौन्सिल आणि नगरविकास मंत्री यु टी खादर यांची मंगळवारी बैठक झाली यावेळी खादर यांनी शहरातील जनतेच्या मूलभूत समस्या जाणून घेतल्या.सिटीझन कौन्सिल चे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने तब्बल अर्धा तास हुन अधिक काळ विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
ब्रिटिश काळा पासून शहरात भंगी बोळे आहेत रहदारी वाढल्या नंतर त्या भंगी बाळांचा वापर ट्रॅफिक साठी पार्किंग साठी करावा असा प्रस्ताव आला होता कालांतराने तो बारगळला आहे. शहरातील बहुतांश भंगी बोळ बिल्डर लॉबीनी अतिक्रमित करून टाकले आहेत अनेक खाजगी लोकां कडून भंगी बोळांचा वापर सुरू झाला आहे ही बाब सिटीझन कौन्सिलने मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.हे भंगी बोळात डांबरीकरण करून रस्ते करावे अशी मागणी कऱण्यात आली बोळातील रस्ते झाल्याने रहदारीत नियंत्रण करण्यास मदत होईल असे सिटीझन कौन्सिलने म्हटले आहे.
बेळगाव महा पालिका आणि इतर सरकारी विभागात सुसंवाद नसल्याने शहरात अनेक समस्या प्रलंबित आहेत अशी तक्रार करण्यात आली.पहिल्या रेल्वे गेट जवळ गेल्या सहा वर्षा पासून गाळे बांधून ठेवण्यात आलेत त्याच अजूनही विस्थापिताना देण्यात आलेले नाहीत.रेल्वे दुपदरीकरणात या गाळ्यातील नऊ इंच जागा जाणार आहे त्यामुळे या गाळ्यातील काही अंश पाडावा लागणार आहे या प्रकरणाची नेमकी चौकशी करून गाळे गरिब विस्थापिताना गाळे वितरित करा अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली आता पर्यंत 33 टेंडर झालेत यात अजून कोणतेच मोठे काम झाले नाही काम कासवाच्या गतीनं चालू आहे त्यामुळे सामान्य बेळगावकर कंटाळला आहे.स्मार्ट सिटी आणि पालिकेचा कोणताही अधिकारी कामे स्मार्ट सिटीत घातली आहेत असेच उत्तर देतो मात्र प्रत्यक्षात कामे होताना दिसत नाहीत तोंडाला पाने पुसायचा प्रयत्न चालला आहे याकडे देखील लक्ष द्यावे अशी मागणी केली.
बेळगाव शहरातील बाजार पेठेत गोवा इतर कडचे सगळे लोक येत असतात मात्र मुख्य बाजार पेठेत महिलांसाठी टॉयलेटची सोय नाही.या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या शहराला ज्या फेरी वाल्यांनी विळखा घातलाय त्या सर्व फेरी वाल्याना नियम घालून हॉकर झोन निर्माण कर,प्रत्येक वार्डात महा पालिकेचे दवाखाने उभे करा अश्या मागण्या केल्या आहेत.
नगर विकास मंत्री कुमारस्वामीं मंत्रिमंडळातील तरुण मंत्री आहेत ते भंगी बोळ अश्या बेधडक कारवाई करण्यासाठी प्रसिद्ध आहेत बेळगाव पालिकेतील सुस्त अधिकाऱ्यांना ते सुता सारखे सरळ करतील अशी अपेक्षा आहे.यावेळी विकास कलघटगी, सेवंतीलाल शाह आदी उपस्थित होते.