बेळगाव शहरात घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या कार फोडणाऱ्या चौघा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते आता त्यांचा पाचवा साथीदार हाती लागला असून त्यालाही अटक करण्यात आली आहे.
विनायक संजय सांबरेकर( वय २०) रा. गणाचारी गल्ली असे त्याचे नाव असून त्यालाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
यापूर्वी झालेल्या दोन फिर्यादीवरून रामचंद्र प्रमोद मुचंडी( वय १९), अभिजित गजानन नावगेकर(वय २६) दोघे रा. शिवाजीरोड आणि किसन नारायण सांगडे( वय २६)रा. कंग्राळ गल्ली व स्वप्नील चंद्रकांत देसुरकर( वय २२) रा. देसुरकर चाळ, गोंधळी गल्ली यांना अटक झाली होती.