Thursday, May 23, 2024

/

येळ्ळूर मारहाण प्रकरणाची सुनावणी १९ फेब्रुवारीला

 belgaum

येळ्ळूर येथे फलक काढल्यावरून पोलीस व ग्रामस्थ अश्या झालेल्या संघर्षात पोलिसांनी गावात घुसून नागरिकांना अमानुष मारहाण केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १९ फेब्रुवारीला होणार आहे. या सुनावणीला फिर्यादी, पंच आणि सर्व साक्षीदारांनी उपस्थित राहण्याचा निर्वाणीचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

काल या प्रकरणाची सुनावणी होती पण अनेकजण अनुपस्थित राहिले होते त्यामुळे न्यायालयाने पुढील तारीख देऊन त्या तारखेला उपस्थित राहिलेच पाहिजे असा आदेश दिला आहे.

ज्यांच्यावर खटला आहे ते हजर राहत आहेत पण फिर्याद देणारे उपस्थित राहत नाहीत हे लक्षात आल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. मागच्या तारखेलाही अनुपस्थित राहणाऱ्यांवर न्यायालयाने वॉरंट बजावले होते.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.