belgaum

माजी सैनिकांसाठी डीएससी भरती मेळावा; १ डिसेंबरपासून प्रक्रिया

0
Maratha centre logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह: मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे १ आणि २ डिसेंबर २०२६ रोजी डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स (DSC) मध्ये भरतीसाठी विशेष भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सैनिक जनरल ड्युटी (Soldier GD) आणि सैनिक क्लर्क (SD) या पदांसाठी भरती केली जाणार आहे.

ही भरती केवळ मराठा लाईट इन्फंट्रीमधून नियमित सैन्यदल किंवा टेरिटोरियल आर्मीमध्ये (TA) सेवा बजावलेल्या माजी सैनिकांसाठी आहे.

सैनिक जनरल ड्युटी पदासाठी निवृत्तीनंतर दोन वर्षांच्या आत पुनर्नियुक्तीसाठी अर्ज करणे आवश्यक असून, उमेदवाराचे वय भरतीच्या दिवशी ४६ वर्षांपेक्षा कमी असावे. तर सैनिक क्लर्क (SD) पदासाठी निवृत्तीनंतर पाच वर्षांच्या आत पुनर्नियुक्ती आवश्यक असून, उमेदवाराचे वय ४८ वर्षांपेक्षा कमी असावे.

 belgaum

इच्छुक आणि पात्र माजी सैनिकांनी १ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भरतीसंदर्भातील अधिक माहितीसाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.