शाळेत बसून बसून कंटाळा आल्याने बेपत्ता झालेले तीन विध्यार्थ्यांचा शोध मंदिरात लागला आहे त्यामुळे पालक शिक्षक आणि शोध घेणाऱ्या पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
बेळगाव शहरातील वैभवनगर भागातील शिवयोगी या निवासी शाळेचे तीन विद्यार्थी बुधवार सकाळ पासून बेपत्ता झाले होते
ते घरातून शाळेला जातो म्हणून बाहेर पडले होते मात्र ते शाळेत पोहोचलेच नाहीत त्यामुळे त्यामुळे त्यांचा शोध घेतला जात होता.
बसव कॉलनी येथील नागय्या पुजारी यांची अमृता वैभव विशाल अशी तिन्ही या शालेय विद्यार्थ्यांची नावे असून ती खडे बाजार भागातील एका मंदिरात बसली होती पोलिसांनी त्यांचा शोध लाऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केलं आहे.
पोलिसांनी या मुलांचा शहरातील हॉटेल रेस्टोरंट उद्यानातून थिएटरमध्ये शोध घेतला मात्र ती एका मंदिरात बसलेली आढळली आहेत.
घरातून बाहेर पडतेवेळी सदर मुलांनी घरातील ₹100 आणले होते आणि त्यांनी खायला भजी आणि ऑटो खर्च केले असल्याची माहिती मिळाली आहे