सुळगे येथील देवस्की पंचाचा खून

0
5232
Vaiju kamble
 belgaum

सुळगे(हिंडलगा) येथील देवस्की पंचाचा(कोलकार) खून करून मृतदेह लावण्यवेल मंगल कार्यालय जवळील ओढ्यात फेकून देण्यात आला आहे मंगळवारी मृतदेह मिळाल्याने या भागात खळबळ माजली आहे.वैजू व्यंकाप्पा कांबळे (50)रा.सुळगे असे त्यांचे नाव आहे.

या बाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार वैजू हे सोमवारी रात्री पासून बेपत्ता होते त्या नंतर त्यांची शोधाशोध सुरू झाली होती अंबिका हॉटेल जवळील टेंबाळी नाल्यात त्यांचा मृतदेह आढळला आहे.मृतदेह आढळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.घटनास्थळी काकती पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.

Murder in sulga

 belgaum

व्यंकु यांचा खून झाला असून नाल्यात मृतदेह टाकून देण्यात आला आहे मात्र हा खून कश्यासाठी झाला आहे याचा तपास पोलीस करताहेत.गेल्या आठवड्यात मारिहाळ येथील डबल मर्डर त्यानंतर कालच संतीबस्तवाड येथे युवकाचा तीक्ष्ण हत्त्याराने भोसकून खून या घटनेनंतर बेळगाव तालुक्यातील ही खुनाची आठवड्यातील तिसरी घटना आहे.काकती पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.