Tuesday, January 14, 2025

/

अवकाळीची दमदार चाहूल; हवामान खात्याने वर्तविला अंदाज!

 belgaum

कडाक्याचा उन्हाळा कुठे जाणवू लागला असताना आता पावसाने पुन्हा एकदा दार ठोठावलं आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. देशभरातील अनेक राज्यात 18 ते 21 मार्च 2021 दरम्यान मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) काही ठिकाणी वीजा आणि गारपीटीची शक्यताही वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी याआधीच आपला शेतमाल जपून ठेवावा अशा सूचना देखील हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

उत्तर कर्नाटक ते मध्य प्रदेशाचा आग्नेय भाग व महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. या क्षेत्राची आज आणि उद्या आणखी तीव्रता वाढून पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. त्यामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडेल

. अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि दक्षिणेकडून येणारे वारे एकत्रित येणार असल्यानं होणाऱ्या आंतररक्रीयेच्या प्रभावामुळे पोषक स्थिती असल्याची माहिती वेधशाळेकडून देण्यात आली आहे. यामुळे 18 ते 21 या तीन दिवसात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी अंशतः हवामान राहणार असून, राज्यातील उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा आणखी वाढणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. त्यातच पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरू झाला झाल्याने वातावरणात वेगाने बदल होऊ लागले आहेत. रात्रीची थंडी कमी होत असली तरी पहाटे काही प्रमाणात गारठा असतो, तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. दरम्यान, अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे.

आधीच बिघडलेली आर्थिक स्थिती आणि त्यात आता अवकाळी पावसाने शेतीवर होणारा विपरित परिणाम यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. अनेक पिकांवर अवकाळी पावसाचा वाईट परिणामी होतो आणि हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमीतकमी नुकसान व्हावं यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.