बहुचर्चित भाजपा उमेदवारी अध्यायाची अखेर सांगता झाली असून बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
लोकसभा पोटनिवडणुक घोषित होण्यापूर्वी उमेदवारी कोणाला मिळणार हा प्रश्न संपूर्ण बेळगावसह राज्यभरात उपस्थित...
कोरोना प्रादुर्भावाचा वाढता धोका लक्षात घेऊन आगामी गुढी पाडवा (उगादी), होळी, शब् -ए -बरात, गुड फ्रायडे आदी सण सार्वजनिकरीत्या साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटक सरकारचे मुख्य सचिव पी. रविकुमार यांनी आज गुरुवार दि. 25 मार्च रोजी हा...
बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 29 रुग्ण आणि राज्यात काल बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत 2,523 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 27,266 तर राज्यातील 9,78,478 इतकी झाली आहे. राज्यात सध्या 18,207 सक्रिय रुग्ण...
लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत समिती उमेदवाराला भक्कम पाठिंबा देण्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत लोकसभा...
टिळकवाडी दुसरे रेल्वे फाटक आणि धर्मवीर संभाजी चौक (बोगरवेस) तेथे धूळखात पडून असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचे नूतनीकरण करून ती खुली केली जावीत. त्याचप्रमाणे व्हॅक्सिन डेपो मैदान येथे स्वच्छता मोहीम राबवून याठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करावी, अशी मागणी फेसबुक फ्रेंड्स सर्कलने जिल्हाधिकारी...
सरकारला सर्वाधिक महसूल देणाऱ्या बेळगाव उपनोंदणी अर्थात सब रजिस्ट्रार कार्यालयातील एका अधिकाऱ्याला सरकारला नुकसानीत आणल्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे.
निलंबित करण्यात आलेल्या अधिकार्याचे नांव विष्णुतीर्थ असे आहे. मालमत्तेची नोंदणी करताना सरकारी दरापेक्षा त्याची किंमत कमी करून लावण्यात आल्यामुळे...
खानापूर (जि. बेळगाव) शहरातील हायटेक बस स्थानकाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. पण निविदा प्रक्रियेचे काम अर्धवट राहिल्याने काम रेंगाळले आहे. कर्नाटक राज्य सरकार जाणीपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित...
बेळगाव जिल्ह्यात कोविड १९ नियंत्रण मार्गसूची आणि पोटनिवडणुका आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, संघ -संस्थांनी कोविड मार्गसूची आणि निवडणूक आचारसंहितेचे पालन करावे. कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यापूर्वी पूर्वपरवानगी घ्यावी, कोविड नियंत्रणासाठी सरकारी मार्गसूचीचे काटेकोरपणे पालन करावे, असे...
बेळगाव शहर परिसरात काल पडलेल्या वादळी वाऱ्यासह दमदार पावसामुळे तुंबलेल्या ड्रेनेज आणि गटारीचे सांडपाणी व केरकचरा रस्त्यावर आल्यामुळे शहराच्या पूर्वेकडील बी. एस. येडियुरप्पा मार्ग संपूर्णपणे अस्वच्छ होऊन त्याची दुर्दशा झाली आहे. दरवर्षी या मार्गावर हा प्रकार घडत असल्याने याकडे...
लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी आज वार्ताभवनला भेट दिली. लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसंदर्भात प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि जाहिरातींवर कटाक्षाने लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.
गुरुवारी के. हरिशकुमार यांनी मीडिया मॉनिटरिंग स्केलला भेट देऊन...