आमदारकी निवडणुकीपेक्षा ही प्रतिष्ठेची मानली जाणारी ग्रामपंचायत निवडणूक मोठ्या आतुरतेने आणि ईर्षेने पार पडते. मात्र जे नूतन सदस्य आहेत त्यांना या ग्रामपंचायत मधील कारभाराचा अनुभव नसतो.
त्यामुळे अनेक माजी ग्रामपंचायत सदस्य आणि तेच परत निवडून येणारे अनुभवी सदस्य नूतन ग्रामपंचायत सदस्यांना दिशाभूल करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकार सध्या उघडकीस येत आहेत. त्यामुळे अनुभवी ग्रामपंचायत सदस्यांचा डंका आणि नुतन ग्रामपंचायत सदस्यांना फटका अशी अवस्था सध्या तालुक्यात दिसून येत आहे.
विशेष करून बेळगाव तालुक्यातील उत्तर भागातील एका ग्रामपंचायतमध्ये असे प्रकार आढळून येत आहेत. अनेकाने सदस्य अशा सदस्यांना वैतागले आहेत. त्यामुळे अशा सदस्यांच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर जे माजी सदस्य निवडून येतात त्यांनी आपल्या मनमानी कारभाराचा त्रास अनेकांना देण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे अशीच परिस्थिती राहिली तर काही नूतन सदस्य आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आपण दोन ते तीन वेळा ग्रामपंचायतीवर निवडून आलो आहोत त्यामुळे येथील कारभार आपल्याला सारा माहित आहे. आमच्या आदेशानुसारच कामे करा असे ठणकावून सांगणार्या अनुभवी सदस्यांनी नूतन सदस्यांना सोबत घेण्याऐवजी विगघटनाची सुरुवात केली आहे. जर हीच परिस्थिती राहिली तर पुन्हा एकदा अशा ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होतील याची शक्यता नाकारता येत नाही आणि जे सत्तेत आले आहेत त्यांची सत्तालालसा ही कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
त्यामुळे नुसतं सदस्यांना सामावून घेऊन विकासाची वाट धरण्याची गरज व्यक्त होत असून याकडे आता संबंधितांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. नुकतीच बेळगाव उत्तर भागातील दहा किलोमीटर वर असणारी एक नामांकित ग्रामपंचायतमध्ये असे प्रकार सुरू आहेत. किंबहुना या प्रकाराने अनेक नूतन सदस्य नाराजीचा सूर ओढत आहेत. याच ग्रामपंचायत मधून जिल्ह्याचे नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी आहेत. मात्र त्यांनी आपल्या हट्टापायी आणि आपली सत्ता लालसेपोटी नूतन सदस्यांना नाराजी करण्यावर भाग पडले आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जर जे अनुभवी सदस्य आहेत त्यांना सूचना केल्या नाही तर येत्या काळात मोठे आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत सुरू असतानाही आपल्या अनुभवाच्या गैर प्रकारामुळे अनेक सदस्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांना सूचना केल्यास पुढील भवितव्य योग्य ठरणार असे मत अनेक सदस्यांनी व्यक्त केले आहेत.