बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. के. हरीश कुमार-
बेळगाव लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची बदली झाली असून बेळगावच्या नूतन जिल्हाधिकारीपदी डॉ. के. हरीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एम. जी. हिरेमठ हे मूळचे बेळगाव तालुक्यातील के. के. कोप्प गावचे रहिवासी आहेत. महांतेश हिरेमठ बेळगाव जिल्ह्यातीलच असल्याने निवडणुकीदरम्यान त्यांची बदली झाली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे. नूतन जिल्हाधिकारी हरीश कुमार हे बंगळुरूमध्ये कर्मचारी आणि प्रशिक्षण आयुक्त म्हणून कार्यरत होते.