जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजचा एम बी बी एस च्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आणि एन एस एस स्वयंसेवक प्रणव अध्यापक याने बेंगळुरू येथे झालेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.नेहरू युवा केंद्र बेंगळुरू यांच्यातर्फे सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.नेहरू युवा केंद्राचे कर्नाटकचे संघटन संचालक सुनील मलिक यांच्या हस्ते प्रणव याला पंचवीस हजार रु.आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
देशप्रेम आणि राष्ट्र उभारणी असा वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता.कर्नाटकातील प्रत्येक जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.राज्यातून एकोणतीस स्पर्धक बेंगळुरू येथे झालेल्या स्पर्धेत सहभागी झाले होते.
आता नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्रणव अध्यापक कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणार आहे.त्याला जे.एन.मेडिकल कॉलेजच्या प्राचार्य डॉ.एन .एस.महांतशेट्टी,उप प्राचार्य डॉ.व्ही.ए.कोठीवाले ,डॉ.आर.एस.मुधोळ,,डॉ.ए.पी.होगाडे, जे एन एम सी स्टुडंन्ट कौन्सिल व्हाईस प्रेसिडेंट डॉ.रेखा मुधोळ,काहेरचे एन एस एस समन्वयक डॉ.एम.एस.शिवस्वामी,एन एस एस ऑफिसर डॉ.रवींद्र होन्नुगार आणि डॉ.अश्विनी नरसण्णवर यांचे मार्गदर्शन लाभले.