लग्न म्हणजे बँड वाजप मंडप हे सगळं आलं मात्र याला फाटा देत मयताच्या जळत असलेल्या चिते समोर अनोखा अस लग्न सदाशिवनगर स्मशानभूमीत पार पडलं.दरवर्षी सहा डिसेंम्बर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने स्मशान भूमीत रात्र वास्तव्य करून अंधश्रद्धा विरोधात जनजागृती करणारे माजी मंत्री यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी यावर्षी चक्क स्मशानात एका जोडप्याचे शुभमंगल करवत अंधश्रद्धा विरोधात शड्डू ठोकला आहे.
मानव बंधू वेदिकेच्या माध्यमातून जारकीहोळी यांनी बेळगावच्या सदाशिवनगर स्मशानभुमीत एका जोडप्याला बोहल्यावर चढवत आंतरजातीय विवाह आयोजन केले होते.परिवर्तन दिन आणि खास अमावस्येच्या निमित्ताने सोपान बाळकृष्ण जांबोटी रा.तिर्थकुंडये (दलित) रेखा चंद्रप्पा गुरवंन्नवर हिरेबागेवाडी( लिंगायत)या दोघांचा विवाह स्मशानभुमीत पार पडला त्या जोडप्यांना जारकीहोळी यांनी स्वतः कडून 50 हजार रुपयांचे बक्षीसही दिले आहे. बंधू वेदिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पुस्तक प्रदर्शन पेंडाल आणि विविध स्टॉल भरवल्याने स्मशानभूमीला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
अंधश्रद्धा जनजागृती म्हणून विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टर मधून प्रवास करवणार असे सांगत त्यांनी आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना राज्य सरकार दोन लाख रुपये मदत निधी देते आता स्मशानात विवाह करणाऱ्या जोडप्यांना तीन लाख रुपये मदत द्या अशी मागणी जारकीहोळी यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याकडे ते विनंती करणार आहेत.
दलितांच्या घरी राज्य घटनेचं पुस्तक असत नाही तसेच लिंगायतांच्या घरात बसवणा यांचे वचन सापडत नाहीत वाल्मिकी समाज बांधवांच्या घरी रामायण दिसत नाही ते महान पुरुषांनी लिहिलंय मात्र याचं मार्केटिंग दुसरेच करत आहेत असे मत सतीश जारकीहोळी यांनी मांडले.सदाशिवनगर येथील स्मशान भूमीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यावेळी जारकीहोळी बोलत होते.यावेळी
मागील निवडणुकीत राहू काल मध्ये मी नामपत्र दाखल केल होतं म्हणून माझा लीड कमी झालाय असे बोलले जात आहे मात्र अनेक जणांनी केरळ शिरसी आदी ठिकाणी जाऊन पूजा पाठ केलाय ते निवडणूक हरलेत त्याचं काय?असा प्रति प्रश्न त्यांनी केलाय.खरं तर निवडणुकीत मी कमी खर्च केलाय दोन तीन कोटी खर्च केला असता तर 20 हजार लीड वाढला असता पुढील निवडणुकीत पुन्हा राहू काळात च नामपत्र दाखल करणार आणि अधिकाधिक मतांनी निवडून येणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.