बेळगावातील शिव जयंती आणि गणेश उत्सवास उत्तर कर्नाटकातील विविध जिल्ह्यातून बंदीबस्ता साठी पोलीस कर्मचारी बेळगावला येत असतात अश्याच एका विजापूर हुन बेळगाव ला बंदोबस्तासाठी आलेल्या पालिसाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु झाला आहे. भीमराव चननप्पा पुजारी वय 50 अस या दुर्दैवी पोलिसाचं नाव असून तो इंडी पोलीस स्थानकात कार्यरत होता .त्यांचं मूळ गाव जंबगी असून बेळगावातील मार्केट पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात तो बंदोबस्ता साठी आला होता.त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा ,तीन मुलो असा परिवार आहे.
हॉस्पिटलचा हलगर्जीपणा
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सकाळी 9:30 त्याला छातीत वेदना होत असल्याने के एल ई इस्पितळात दाखल करण्यात आल होत यावेळी इ सी जी काढण्यात आला होता त्यावेळी इ सी जी नॉर्मल आहे म्हणून गोळ्या देऊन सोडून देण्यात आलं होतं त्यानंतर भीमराव हे आपल्या खोलीवर विश्रांती घेत होते पुन्हा अकरा वाजता त्यांना वेदना सुरू झाल्याने इस्पितळात दाखल करण्यात आलं त्यावेळी त्यांचा यात मृत्यु झाला.दरवर्षी बाहेरून पोलिस बंदोबस्ता साठी बेळगावला येत असतात. सकाळी इस्पितळात दाखल केल्यावर योग्य उपचार झाले असते तर पोलीस वाचला असता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.