बेळगाव उत्तर विभागाच्या प्रादेशिक आयुक्त पदी बागलकोट भु संपादन आणि पुनरवस्ती खात्याचे आयुक्त शिवयोगी कळसद यांची बेळगाव उत्तर विभाग प्रादेशिक आयुक्त प्रभार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
2006 मध्ये शिवयोगी कळसद यांनी बेळगाव महा पालिकेच आयुक्त पद भूषविले होत माजी महसूल मंत्री एम पी प्रकाश यांचं अप्पर सचिव,हेस्कॉम चे एम डी म्हणून देखील काम केलं आहे. त्यानंतर आय ए एस बढती मिळाल्यावर अनेक ठिकाणी उच्च पदावर काम केलं आहे.
एन जयराम यांच्या बदली नंतर रिक्त असलेल्या प्रादेशिक आयुक्त पदाचा पदभार दोन दिवसात घेतील अशी माहिती मिळाली आहे.सध्या कळसद कृष्णा खोरे विकास महा मंडळाचा देखील प्रभार आहे
.



