भाजपच्या माजी आमदारा विरोधात वाढला असंतोष

0
9
Waghwade
 belgaum

भाजपाचे माजी आमदार संजय पाटील यांनी मराठी समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत झाल्या नंतर या घटनेला मराठी भाषिकातून तीव्र विरोध व्यक्त होत आहे.

हलगा ग्रामस्थांनी फलक बनवून निषेध व्यक्त केला आहे तर वाघवडे ग्रामस्थांनी प्रतिमेचे दहन करून आपला राग व्यक्त केला आहे.शिवसेना वाघवडे शाखेच्या वतीनं प्रतिमेची रॅली काढून जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात विरोधकांनी ग्रामीण भागात बॅनर लावले होते त्याविरोधात बोलताना संजय पाटील यांची जीभ घरसली होती आणि त्यांनी मराठी बाबत अपमानास्पद शब्द वापरले होते.Waghwade

 belgaum

भाजप रात्रीच्या वेळी बॅनर लावत नाही तर मराठी माणसे रात्रीच्या वेळी असली कामे करत असतात असे वक्तव्य केले होते त्याविरोधात संजय पाटील यांच्या विरोधात जोरदार वातावरण तापले आहे.

एकीकडे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने पंचमसाली लिंगायत समाजाच्या वतीने देखील निषेध नोंदवला होता व संजय पाटील यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती.एकूणच बेळगाव ग्रामीण मतदारसंघात संजय पाटील यांच्या विरुद्ध वातावरण तापले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.