बेळगाव पोलिसांनी एका मुस्लीम महिलेसोबत प्रवास करणाऱ्या तरुणाला मारहाण आणि लुटल्याच्या आरोपावरून ऑटो चालक आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. ऑटो चालक दाऊद कतीब, अयुब आणि युसूफ पठाण अशी या तिन्ही आरोपींची ओळख आहे.
एका वेगळ्या समाजातील युवक दाऊदच्या ऑटोरिक्षामध्ये...
येत्या 1 नोव्हेंबर काळ्या दिनी काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात तालुक्यातील गावागावांमध्ये जनजागृती करून विभागवार बैठका घेण्याद्वारे मोर्चा भव्य प्रमाणात यशस्वी करण्याचा निर्धार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आज झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
रेल्वे ओव्हर ब्रिजनजीकच्या मराठा मंदिर सभागृहांमध्ये आज सायंकाळी...
कर्नाटक राज्य मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी आमदार रमेश जारकीहोळी यांनी जोरदार कसरतीला सुरुवात केली असून आज त्यांनी बेंगलोर येथे मुख्यमंत्री बसावराज बोम्मई यांची भेट घेऊन चर्चा केली. दिल्ली दौऱ्यावर जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन बाहेर पडताना प्रसिद्धी माध्यमांच्या...
साप म्हटलं की आपण भीतीने एक पाऊल मागे सरकतो. तथापि हा वन्यजीव शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. हेच मित्रत्वाचे नाते आज एका अस्सल नाग सापाने एका युवा शेतकऱ्यांशी कांही काळ खेळून जणू सिद्ध केल्याची घटना आज अनगोळ येथे घडली.
अनगोळ येथील...
ऑल इंडिया लॉयर्स असोसिएशन फॉर जस्टिसने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना नोटीस पाठवून माफी मागण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी नुकतेच केलेले वक्तव्य मागे घ्यावे असे नोटीसीत म्हटले आहे.
10 पानांच्या नोटीसमध्ये असोसिएशनने कर्नाटकातील जातीय हिंसाचाराच्या वाढत्या घटनांची यादी दिली आहे,...
पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नाही आणि कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावातील एक शेतकऱ्याने आपले जीवन संपविले आहे.
शेतकरी हनुमंत मुराचट्टी यांनी मंगळवारी आपल्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली.
जमिनीची लागवड...
तलावामध्ये विषारी रसायन टाकण्यात आल्यामुळे शेकडो मासे मृत होऊन सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची खळबळजनक घटना कडसगट्टी गावांमध्ये उघडकीस आली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात असणाऱ्या कडसगट्टी गावानजीकच्या लघुपाटबंधारे तलावामध्ये अज्ञातांनी विषारी रसायन टाकल्यामुळे तलावातील मासे मोठ्या प्रमाणात मृत...
बेळगावचा एजाझ इनामदार हा भारतातील एकमेव सायकल विक्रेता आहे की ज्याने हिमाचल प्रदेश येथे नुकतीच आयोजित केलेली प्रतिष्ठेची 'आंतरराष्ट्रीय 9 वी हिरो स्प्रिंट एमटीबी सिमला -2021' ही खडतर शर्यत यशस्वीरित्या सायकलिंग करून पूर्ण केली आहे. त्याला बेळगावचे त्याचे दोन...
स्वामी विवेकानंद बेळगावात भारत देशात सुधारणा घडवण्यासाठी,सनातन धर्माच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी, भारताचा अध्यात्मिक वारसा आणि भारतीय समाजमनाला जागृत करण्यासाठी म्हणून स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण भारत देशात सन्याशी म्हणून भ्रमण केले.भारत भ्रमण करत असताना स्वामी विवेकानंद बेळगावला १६ ऑक्टोबर १८९२...
शिवाजीनगरला दरवर्षी भेडसावणारी पुराची समस्या निकालात काढण्यासाठी पावसाळ्यात अशोकनगर कडील नाल्यातून मोठ्या प्रमाणात शिवाजीनगर नाल्याला मिळणारे पाणी मधोमध भींत बांधून परस्पर महांतेशनगर कॉर्नर येथील ब्रिजच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या नाल्यात सोडण्यात यावे, अशी जोरदार मागणी शिवाजीनगर येथील नागरिकांकडून केली जात...