29 C
Belgaum
Friday, March 31, 2023
 belgaum

Daily Archives: Oct 18, 2021

बुडाची बैठक होणे आवश्यक: रॅली काढून आणणार दबाव

बुडाच्या शेवटच्या दोन बैठका आमदार, नामनिर्देशित सदस्य आणि सरकारी प्रतिनिधी यांच्या अनुपस्थितीमुळे कोरमअभावी बारगळल्या होत्या. बुडा सदस्य आणि अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे कणबर्गी मधील स्कीम क्रमांक 61, आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम, उद्याने, क्रीडांगणे आणि रस्त्यांचा विकास असे अनेक विकास प्रकल्प थांबलेले...

कर्नाटक राज्योत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करू द्या: कन्नड संघटनांची मागणी

कर्नाटक राज्यात साधेपणाने साजरा करा. मिरवणुका काढू नका. कोरोनाचे नियम आहेत .असे बेळगावच्या जिल्हाधिकार्‍यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. मात्र राज्योत्सव मिरवणूक मोठ्या प्रमाणात काढू द्या अशी मागणी कन्नड संघटना करत आहेत. या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून निदर्शने करण्यात...

बेळगावच्या क्रिकेटप्रेमींसाठी लवकरच एक खुशखबर: आमदार बेनके

बेळगावच्या क्रिकेटप्रेमींसाठी लवकरच एक खुशखबर: आमदार बेनके -बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी बेळगावच्या क्रिकेटप्रेमींसाठी लवकरच खुशखबर देणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी काल सरदार ग्राउंडवर भेट देऊन स्थानिक मित्र, पत्रकार आणि हितचिंतकांच्या बरोबर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी परिसरात निर्माण...

25 पासून पुनश्च सुरू 1ली ते 5 वीचे वर्ग : स्विमिंग पूलना परवानगी

कर्नाटक राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सातत्याने घटणारी कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेऊन तांत्रिक सल्लागार समितीने काल रविवारी कोरोना निर्बंध आणखी शिथिल करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार राज्य सरकारने आणखी कांही क्षेत्रांवरील निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार कर्नाटकातील...

..इथे ओशाळली माणुसकी : वृद्धाची बंदिवासातून मुक्तता

माणुसकी हरवलेल्या कुटुंबीयांच्या दुर्लक्षामुळे स्वतःच्याच घरात आजारी व जखमी अवस्थेत असहाय्यपणे बंदिस्त पडून असलेल्या हे एका वयोवृद्ध इसमाला हेल्प फाॅर निडीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची घटना आज दुपारी सपार गल्ली वडगाव येथे घडली. याबाबतची माहिती अशी की,...

मांजामुळे मोटरसायकलस्वार जखमी

मोटरसायकलवरून जाणारा एक युवक गळ्यात पतंगाचा मांजा अडकून जखमी झाल्याची घटना काल रविवारी सायंकाळी कपलेश्वर उड्डाणपुलावर घडली. यल्लाप्पा भिमाप्पा चतुर (वय 30, रा. यरमाळ) असे जखमी युवकाचे नांव आहे. काल रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कपिलेश्वर उड्डाणपुलावरून मोटरसायकलवरून जात असताना गळ्यात...

बुद्धिबळाचा खेळ व्यक्तिमत्व विकासासाठी पूरक : डीसीपी डॉ. विक्रम आमटे*

बुद्धिबळाचा खेळ बुद्धीला चालना देणारा आणि व्यक्तिमत्व विकासासाठी पूरक आहे, असे बेळगावचे डीसीपी डॉ. विक्रम आमटे म्हणाले. भाग्यनगर येथील गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमी यांच्यावतीने आणि बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या सहयोगाने आयोजित एक दिवशीय जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात...

आता प्रत्येक तालुक्यात दरमहा कामगार अदालत

कामगारांच्या समस्या आणि भरपाई संदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी राज्यभरात घेतल्या जाणाऱ्या कामगार अदालतीला मिळणारा उत्तम प्रतिसाद लक्षात घेऊन आता दरमहा प्रत्येक तालुक्यामध्ये कामगार अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. गेल्या कांही महिन्यांपासून राज्यात कामगार अदालत आयोजित करण्याद्वारे प्रशासकीय व कामगार पातळीवर भेडसावणारे...

राज्यस्तरीय युवा दसरा श्री स्पर्धेत ‘हा’ ठरला बेस्ट पोझर!

भारतीय शरीरसौष्ठव महासंघाशी (आयबीबीएफ) संलग्न असलेल्या कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने शिमोगा येथे नुकत्याच पार पडलेल्या युवा दसरा श्री -2021 या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेतील 'युवा दसरा श्री -2021' हा मानाचा किताब बेंगलोरच्या सर्वनन हरिराम याने पटकाविला, तर स्पर्धेतील...

बेळगावचा मिशन मॅन पुण्यामध्ये ‘या’ पुरस्काराने सन्मानित

बेळगावचे 'ब्लड मॅन' अथवा 'मिशन मॅन' म्हणून सुपरिचित असणारे फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख आणि फ्रीलान्स कार्पोरेट ट्रेनर संतोष दरेकर यांना येथे समाज सेवेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे येथील स्टार फेअर्स इव्हेंट्स संस्थेतर्फे प्रतिष्ठेच्या 'द एक्स्ट्रा माईल अवॉर्ड् -2021' या...
- Advertisement -

Latest News

श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा

बेळगाव लाईव्ह : श्रीराम नवमी निमित्त आज बेळगावमध्ये श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !