Thursday, April 25, 2024

/

संजय राऊतांकडून समन्वयक मंत्र्यांना घरचा आहेर

 belgaum

सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारची विविध मुद्द्यांवरुन भक्कमपणे बाजू मांडण्याचे काम करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.

समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांना घरचा आहेर देत बेळगाव कडे तिथं जाऊन ग्राउंड वर मदत करण्याची गरज व्यक्त केली आहे याबाबतीत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या देखील निदर्शनास आणून देऊ अस म्हटलं आहे.

बेळगावात मराठी भाषिकांची गळचेपी सुरू असताना महाराष्ट्र सरकार गप्प का, असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे. “कर्नाटकमधे मराठी भाषिकांची गळचेपी होत आहे. कर्नाटकमध्ये 15 टक्के मराठी भाषिक असून ते अल्पसंख्याक आहेत, असं कर्नाटक सरकार म्हणत आहे. सीमा भागात 60 तर 65 टक्के मराठी बांधव आहेत. सीमाभागाचे कानडीकरण केले गेले. मराठी टक्का राजकीय स्वार्थासाठी कमी करण्याचे काम आणि कर्नाटक सरकारचा डाव आहे.Raut shinde bhujbal

 belgaum

राज्य सरकार याबाबत का गप्प आहे, हे कळत नाही. राज्य सरकारने एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ हे दोन मंत्री यासाठी नियुक्त केले आहेत. ते समनव्यक आहेत, या दोन्ही मंत्र्यांनी तिथे जाऊन यासंदर्भात चर्चा करायला पाहिजे. महाराष्ट्र सरकार यावर का गप्प आहे हे कळत नाही, यावर मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नुकताच बेळगावातील मराठी नेते मंडळी कडून संजय राऊत यांची भेट घेऊन बेळगावकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार राऊत महा विकास आघाडी सरकारला बेळगाव बाबत धारेवर धरले आहे.राष्ट्रवादी कडून छगन भुजबळ आणि शिवसेने कडून एकनाथ शिंदे यांची समन्वयक मंत्री म्हणून निवड झाली होती मात्र दोन्ही पैकी कुणीही बेळगावकडे फिरकले नाहीत अशी खंत सीमा वासीय व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.