belgaum

नगरसेवक शाहिद पठाण यांच्याविरोधात तीव्र निदर्शने

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विकास शाखेच्या उपआयुक्त लक्ष्मी निपाणीकर यांना नगरसेवक शाहिद खान पठाण आणि संदीप जीरग्याळ यांनी अपशब्द व असंवैधानिक भाषा वापरून अवमानित केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या घटनेनंतर संतापलेल्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचारी वर्गाने मनपा कार्यालयासमोरस्त्यावर धरणे आंदोलन करत जोरदार निदर्शने केली.

बेळगाव महापालिका कार्यालयासमोर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू असताना, नगरसेवक शाहिद खान पठाण यांनी विकास शाखेच्या उपआयुक्त लक्ष्मी निपाणीकर यांना उद्देशून, ‘तुम्ही काम करण्यास लायक नाही’ असे म्हणत अत्यंत खालच्या पातळीवर दूषणे दिली व असंवैधानिक शब्दांचा वापर केला, असा आरोप करण्यात आला आहे. या अमानुष वर्तनाचा निषेध करत खुद्द अधिकारी लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महापालिका कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह केला.

नगरसेवकांची वृत्ती आणि अरेरावीविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी, प्रशासकीय यंत्रणेवर वरवंटा फिरवणाऱ्या अशा लोकांवर कोणत्याही मुलाहीजाशिवाय कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांना अधिकृतपणे निवेदन सादर केले.

 belgaum

महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शाहिद पठाण यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी मार्केट पोलिस ठाण्याकडे जाणार असल्याची माहिती देण्यात आली. संबंधित प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी मनपा उपायुक्त उदयकुमार तळवार यांनी सांगितले की, “नगरसेवक शाहिद खान पठाण आणि संदीप जीरग्याळ यांनी वापरलेले असंवैधानिक शब्द तातडीने मागे घेऊन सभागृहाच्या समक्ष जाहीर माफी मागितली पाहिजे. अन्यथा आम्ही सर्वजण येथून एकजुटीने मार्केट पोलिस ठाण्यात जाऊन कायदेशीररीत्या फौजदारी गुन्हा दाखल करू,” असा इशारा दिला आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर शाहिद पठाण यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितल्याचे सांगण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.