नगरसेविका सरला हेरेकर या नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात. कधी मनपा सभागृहात आरडाओरड तर कधी रस्त्यात रहदारी पोलिसांशी भांडण अश्या अनेक प्रकारांनी त्यांनी आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आज हायमास्ट दिव्याच्या खांबावर चढून त्यांनी अनोखे असे शोले स्टाईल आंदोलन केले आणि मनपा आयुक्तांसह सर्वच अधिकाऱ्यांची परिस्थिती अवघड करून ठेवली आहे.
आपल्या प्रभाग ४१ मध्ये विकास झाला नाही स्मार्ट सिटी मधून कोट्यवधी रुपये मंजूर झाले असले तरी अधिकारी माझ्या वार्डात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत असा आरोप करत नगरसेविका सरला हेरेकर या विद्युत खांबावर चढल्या होत्या पोलिसांनी एक तास प्रयत्न करून त्यांना खांबावरून खाली उतरवले.
नगरसेविका खांबावर चढली हे बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. एपीएमसी पोलीस निरीक्षक जे एम कालिमिरची यांनी त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला पण आयुक्त आल्याशिवाय मी उतरणार नाही असे सांगून त्या खांबावरच चढून बसल्या होत्या.
शेवटी विनंती करून त्यांना खाली उतरवण्यात आले आहे.